Nashik city 8 ward water supply will shut down for 36 hours what is reason  Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: ऐन दिवाळीत नाशिककरांवर जलसंकट; ८ प्रभागातील पाणीपुरवठा ३६ तासांसाठी राहणार बंद, कारण काय?

Nashik Water Supply News: ऐन दिवाळीत शहरातील ८ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी ३६ तासांसाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Satish Daud

Nashik Water Supply News

नाशिककरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन दिवाळीत शहरातील ८ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी ३६ तासांसाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रांच्या सॅम्प दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं महापालिकेने सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रभावित होणाऱ्या ८ प्रभागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावं, तसेच पाण्याची साठवण करून ठेवावी, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. जल वाहिनीची गळती झाल्याने ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी नाशिककरांवर जलसंकट ओढवलं होतं.

त्यातच आता ८ प्रभागांमधील पाणीपुरवठा ३६ तासांसाठी बंद ठेवला जाणार असल्याने नाशिककरांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारे ८ प्रभाग नाशिकरोड विभागातील आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद?

यामध्ये प्रभाग क्रमांक १७ मधील लोखंडे मळ्यासह इतर परिसर, प्रभाग १८ मधील परिसर, प्रभाग १९ मधील परिसर, प्रभाग २० मध्ये पुणे रस्ता आणि इतर परिसर, प्रभाग २१ मधील जयभवानी रोड, सहाणे मळा, आणि परिसर, प्रभाग २२ मध्ये विहितगावसह इतर परिसर, याशिवाय प्रभाग २३ आणि प्रभाग ३० मधील परिसरांचा समावेश आहे.

तर उपरोक्त आठ प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक १६ मधील उपनगर, शांतीपार्क, अयोध्यानगर, मातोश्रीनगर, शिवाजीनगर, आरटीओ कॉलनी, तोरणा सोसायटी, समतानगरसह परिसरातील इतर भाग, अशा एकूण ९ प्रभागात पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT