Nashik Chandwad Rahud Ghat accident SaamTV
महाराष्ट्र

Nashik Chandwad Accident : घाट उतरताना ब्रेक फेल, वाहन एकमेकांना धडकले, एक मृत्यू तर २२ गंभीर; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Nashik Chandwad Rahud Ghat Accident : जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाट उतरत असताना हा अपघात झाला आहे.

Prashant Patil

नाशिक : राज्यात अपघातांचं सत्र काही करता थांबत नाहीय. याचदरम्यान, नाशिक-चांदवडच्या राहुड घाटात एक भीषण अपघात झाला आहे. या घाटात ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. अपघात एक महिला ठार तर २० ते २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे.

जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाट उतरत असताना हा अपघात झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं समोर आलं आहे. स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

घाट उतरताना एका वाहनाचा ब्रेक फेल झाला. त्याने पुढे असलेल्या वाहनाला ठोकले, तो जोरात पुढे गेला आणि त्याने अनेक वाहनांना धडक दिली. विशेष बाब म्हणजे, आज दोन वेळा अशा प्रकारचा अपघात झाला आहे. यापूर्वी संध्याकाळी तीन वाहनांचा घाटात अपघात झाला होता. त्यानंतर हा पुन्हा मोठा अपघात आहे. यात अजून किती जण दगावले याचा आकडा समोर येत नाही, अशी माहिती आमचे प्रतिनिधी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT