Nashik Chandwad Accident Truck Hits 7 Vehicles On Mumbai-Agra Highway Saam Tv
महाराष्ट्र

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Mumbai Aagra Highway Accident News : नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने ७ वाहनांना धडक दिल्याने १० जण जखमी झाले असून २ ते ३ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात

  • भरधाव ट्रकने एकापाठोपाठ ७ वाहनांना जोरदार धडक दिली

  • १० जण जखमी झाले असून २ ते ३ जणांच्या मृत्यूची शक्यता

  • पोलीस तपास सुरु

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने एकापाठोपाठ तब्बल ७ वाहनांना जोरदार धडक दिल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. या अपघातात १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, २ ते ३ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड परिसरात मध्यरात्री हा अपघात झाला. ट्रकने अचानक नियंत्रण गमावल्याने समोरून आणि पुढे असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत तब्बल ७ वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.

या भीषण अपघातामागे अन्य कोणते कारण होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अपघातातील मृतांचा आणि जखमींचा अधिकृत आकडा तसेच दुर्घटनेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. चांदवडजवळ झालेल्या या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील रात्रीच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Cholesterol control: औषधं सोडा! तुमच्या दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस; 'या' १० अटींनुसार उपोषणाला परवानगी, जरांगेंकडून प्रत्युत्तर

बीपी, ऍसिडिटी आणि मधुमेहांसाठी फायदेशीर पेरू, रोज खाल्ल्याने होतो फायदा

SCROLL FOR NEXT