nashik news  Saam tv
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरातची बायको फरार? पोलिसांकडून शोधाशोध सुरू

kalpana Kharat : भोंदू अशोक खरातची बायको फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून शोधाशोध सुरू करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे समोर

पत्नी कल्पना खरातवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलिसांत गुन्हा दाखल खरातची बायको फरार

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. भोंदू खरातचे एका पाठोपाठ एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. त्याने मागील तीन दशकात शेकडो कोटींची माया कमावली होती. त्याच्या फसवणुकीच्या धंद्यात त्याची बायको देखील सामील असल्याचा आरोप आहे. बायको कल्पना खरातवर देखील फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अहिल्यानगरमधील शिर्डीमध्ये पोलिसांत कल्पना खरातच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. कल्पना खरातला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस मागावर आहेत. कल्पना खरातला अटक करण्यासाठी दोन पथके नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फरार झालेल्या कल्पना खरातला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सोनोग्राफी सेंटर रडारवर

डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडीकल स्टोअरही पोलीस यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका विशिष्ट मेडीकल स्टोअरमधून गुंगी येणाऱ्या वेदनाशामक आणि इतर काही गोळ्या औषध खरेदी केली जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भोंदू खरातकडे ४ सीमकार्ड

भोंदू अशोक खरातची आज देखील एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. भोंदू अशोक खरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती समोर आलीये. एक नंबर फक्त VIP लोकांसाठी वापरत असल्याची माहिती तपासात समोर आला आहे. तर दुसऱ्या नंबर हा विशेष काही भक्तांसाठी आणि महिलांसाठी वापरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिसरा नंबर हा आर्थिक व्यवहार बघण्यासाठी वापरत असल्याची माहिती समोर आलीये. तर चौथा नंबर हा सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती होता. फॉरेन्सिक टीमकडून सर्व नंबर आणि मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tendli Bhat Recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीचा तोंडली भात कसा बनवायचा?

Watermelon Side Effects: कलिंगड खाल्ल्यानंतर हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नका, थेट हॉस्पीटलमध्ये भरती व्हाल

Maharashtra News Live Update : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Marathi Natak: २० वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' विनय येडेकर साकारणार अतुल परचुरेंची 'ती' आयकॉनिक भूमिका

Crime News : लग्नावरून परतताना रस्त्यात अडवलं, अपहरण करून दोघींवर ८ ते ९ जणांनी केला सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT