Police register fresh case in Kharat scandal as new allegations emerge in Nashik. saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

Nashik Ashok Kharat Case : अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करायचा. नराधम खरातने गर्भवती महिलेवरही लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार

  • पीडिता आणि तिच्या कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख

  • खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल

भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचारप्रकरणात नवा एक कारनामा उघडकीस आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहा. खरातने पूजा विधीच्या नावाखाली एका गर्भवतीवर अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गर्भवती महिलेनेने अत्याचाराची तक्रार देऊ नये म्हणून खरातने पीडिता आणि तिच्या कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता पोलिसात दिलेल्या तक्रारीत धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे.

नराधम खरात महिलेसोबत येणाऱ्या पतीला केबिन बाहेर बसवायचा. ऑफिसच्या आतमध्ये गर्भवती महिलेसोबत लैंगिक चाळे करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, नराधम अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरावयाचा. त्यांना अघोरी कृत्याचा धाक दाखवायचा.

दरम्यान खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव या दोघांना समोरासमोर बसवून विशेष तपास पथकाने चौकशी केली. दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ऑफिसबॉय नीरज जाधवच्या सीडीआरमध्ये ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक आढळले आहेत.

त्यामुळे आता एसआयटीच्या हाती महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसआयटीकडून नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आला आहे. यात सीडीआरमध्ये ३० ते ४०महिलांचे नंबर सापडल्याची माहिती मिळत आहे. नीरज हा महिलांना अशोक खरातचे निरोप देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT