अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्यानंतर राज्यातील बस स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. स्वारगेट बसस्थानक हे नेहमी गजबजलेलं असतं, तरी तेथे सुरक्षा व्यवस्था नीट नसल्याची समोर आलंय. फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातील अनेक बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेला वाळवी लागल्याचं दिसत आहे. पुण्यातील घटनेनंतर राज्यातील बसस्थानकांवरील स्थितीचे रिॲलिटी चेक करण्यात आले. मात्र त्यात अनेक बसस्थानकावरील परिस्थिती भयाण आहे.
मुंबई, पुणे नंतर सर्वात मोठं शहर असलेल्या नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातदेखील सुरक्षेचा बोजबारा उडालेला दिसत आहे. साम टीव्हीच्या टीमकडून नाशिकमधील मध्यवर्ती बसस्थानक आणि मेळा बस स्थानकांचं रिॲलिटी चेक केल्यानंतर तेथील भयान परिस्थिती समोर आलीय. मेळा बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी गर्दुल्ले आणि मद्यपींचा वावर असल्याचं आढळून आलंय.
बसस्थानक परिसरात मद्यपीनी आपला अड्डा बनवलाय. नाशिक बस स्थानकातील आगारमध्ये राज्यभरातील एसटी बसेस येत असतात. त्या जेथे पार्क केल्या जातात , त्या ठिकाणी भयान परिस्थिती आहे. पार्किंगच्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. पार्क केलेल्या बसेसच्या मागे मद्यपींनी दारुचा अड्डा बनवलाय. पार्क केलेल्या बसेसच्या मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसत आहेत.
त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वाहक आणि चालक पार्क केलेल्या बसेस लॉक करत नसल्याचं समोर आले आहे. पार्किंगमधील अनेक बसेसचे दरवाजे उघड असल्याचं समोर आले आहे. बस लॉक नसल्यानं याचा गैरफायदा घेऊन अनैतिक कृत्य घडण्याची शक्यता . स्वारगेटामध्ये घडलेली घटना बसमध्ये घडली होती. बसचे दरवाजे उघडेच होते. नाशिकमधील आगरातील बसेसची स्थिती सारखीच आढळून आलीय.
मध्यवर्ती बस स्थानक आणि मेळा बसस्थानकचा मोठा परिसर आहे. या परिसरात फक्त तीनच सुरक्षा रक्षक आहेत. मात्र तेही ड्युटीवर नसल्याचं साम रिऑलिटी चेक करताना निदर्शनात आलं. इतकेच नाही तर पार्क केलेल्या बसेस ह्या अंधारात उभ्या असतात.बस स्थानकाच्या फलाटावर उजेड असतो, मात्र बसेस पार्क केलेल्या ठिकाणी मात्र काळाकुट्ट अंधार असल्याचं दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे देखील केवळ फलाटांवरच आहेत.
बसेस पार्क होत असलेल्या ठिकाणी परिस्थिती राम भरोसे असल्याचं दिसून आलं. रात्रीच्या वेळी बस स्थानक परिसरात पोलीस गस्त घालतात. मात्र अंधारात बसेसच्या मागे मद्यपींचा अड्डा बनलाय त्यावर त्यांचे लक्ष जात नसल्याचं दिसून आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.