Nashik Breaking News Saptshringi Ghat road will be closed today Administration orders  Saam TV
महाराष्ट्र

Saptashrungi Ghat News: सप्तशृंगीगड घाट आज वाहतुकीसाठी बंद राहणार; प्रशासनाकडून आदेश जारी, काय आहे कारण?

Saptashrungi Ghat Latest News: नाशिककरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सप्तशृंगीगड घाट रस्ता आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik Saptashrungi Ghat Latest News: नाशिककरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सप्तशृंगीगड घाट रस्ता आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाखाली कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

मागील आठवड्यात सप्तशृंगीगड घाटात एसटी बसला अपघात (Bus Accident) होऊन बस दरीत कोसळली होती. ही अपघातग्रस्त बस आज दरीतून बाहेर काढली जाणार आहे. त्यामुळे सप्तशृंगीगड घाट सकाळी १० वाजेपासून ते काम संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे सप्तशृंगीगड ते नांदुरी (Nashik News) आणि नांदुरी ते सप्तशृंगीगडाकडे जाणारी वाहतूक आज सकाळी १० वाजेपासून बंद राहणार आहे. अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मागील आठवड्यात १२ जुलै रोजी सप्तशृंग गडावरील गणपती टप्प्याजवळ बस कोसळली होती. या अपघातात बसमधील एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. तर चालक वाहक यांच्यासह २२ जण जखमी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची ही बस होती.

दरम्यान, अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या कळवण आगार व्यवस्थापनाने परवानगी मागितली होती. राज्य परिवहन मंडळ ही बस दरीच्या बाहेर काढण्याची कार्यवाही करणार आहे. अपघातग्रस्त वाहन काढल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरु होईल असं सांगण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT