Dada Bhuse Sanjay Raut  Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: '२०२४ पर्यंत थांबा, आपोआप तुरुंगात जाणार..' मंत्री दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत कडाडले

Nashik Breaking News: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज (शनिवार, २ डिसेंबर) मालेगाव कोर्टात हजर राहिले. शिंदे गटाचे नेते तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, नाशिक| ता. २ डिसेंबर २०२३

Nashik Political News:

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज (शनिवार, २ डिसेंबर) मालेगाव कोर्टात हजर राहिले. शिंदे गटाचे नेते तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात राऊतांनी मालेगाव कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने संजय राऊतांना तुर्तास दिला असून या प्रकरणी ३ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊतांनी यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री दादा भुसेंवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले संजय राऊत?

"मालेगावचा एक लढवय्या नेता तुरुंगात आहे आणि मी इथे आहे. अद्वय हिरे यांना अटक म्हणजे राजकीय सुडाची कारवाई यालाच म्हणतात. गिरणा साखर कारखाना बचाव समितीच्या नावाखाली दादा भुसे यांनी पैसे घेतले. शेकडो पावत्या माझ्याकडे आहेत, 178 कोटी रक्कम मोठी आहे. भारतीय घटनेनं मला चोराला चोर म्हणायचा अधिकार दिलाय.. " असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

"खरं तर दादा भुसेंनी (Dada Bhuse) तुरुंगात जायला पाहिजे होते. आम्ही हिशेब मागितला तर आमच्यावर कारवाई होते. पण आम्ही काही डरपोक नाही, नोटीस आल्यावर आम्ही पळून गेलो नाही. हिरे कुटुंब शिवसेनेसोबत आहे, म्हणून ही कारवाई झाली." असा गंभीर आरोप राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"आज पोलीस तुमचे आहेत, उद्या आमचे असतील. २024 ला सगळ्या तक्रारींची दखल घेतली जाईल, हिशोब मागितला जाईल. २०२४ पर्यंत थांबा, ज्या जेलमधे अद्वय हिरे (Advay Hire) आहेत त्याच जेलमध्ये दादा भुसे जातील, असा इशारा राऊतांनी दिला. तसेच तुम्ही कितीही अन्याय, जुलूम करायचा ते करा, अद्वय आबा हिरेच पुढील आमदार आहेत. हा संजय राऊतांचा शब्द आहे," असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT