Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Manoj Jarange Health Latest Updates in Marathi Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: जरांगे पाटलांच्या स्वागताला आलेल्या JCBचा अपघात; ३- ४ जण कोसळले | VIDEO

अभिजित सोनावणे

Manoj Jarange Patil News:

मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत आहे. येवल्यामध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतावेळी अपघाताची घटना घडली असून जेसीबीचा हायड्रो अचानक खाली चार कार्यकर्त्ते खाली कोसळले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आज नाशिकच्या (Nashik) येवला येथे दाखल झाले आहेत. भुजबळांच्या बालेकिल्यात जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जरांगे पाटलांचे जेसीबीवरुन फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मागवण्यात आलेल्या जेसीबीला अपघात झाला. फुलांची उधळण करण्यासाठी काही तरुण जेसीबीवर चढले होते. अचानक जेसीबीचा हायड्रा खाली आल्याने ३ ते ४ कार्यकर्ते खाली कोसळले. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला कोपरगाव येथे हलविण्यात आले आहे.

अन् मनोज जरांगे कार्यकर्त्यांवर संतापले...

दरम्यान, यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे मनोज जरांगे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. काही अती उत्साही कार्यकर्त्यांकडून जरांगे पाटील यांना आपल्याच गाडीत बसण्याचा आग्रह करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे जरांगे पाटील संतापले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: आधी चंद्रपूरला आता तेलंगणात बजावणार मतदानाचा हक्क, एकाच निवडणुकीत दोनदा मतदान, ते कसं बरं?

Pune Bogas Voting : माझ्या नावावर कुणीतरी बोगस मतदान केलं; पुण्यातील तरुणी भडकली, VIDEO केला शेअर

Health Tips: गरोदर महिलेने मखाना खावा की नाही?

Proposing Obvious : 'I love You' नाही तर, असं करा आवडत्या व्यक्तीला प्रपोज, उत्तर 'हो'च असेल

Pune Voting: पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, काँग्रेसच्या शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान

SCROLL FOR NEXT