Proposing Obvious : 'I love You' नाही तर, असं करा आवडत्या व्यक्तीला प्रपोज, उत्तर 'हो'च असेल

Relationship Tips : कॉलेजमध्ये असलेले तरुण तरुणी तर अनेकवेळा एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता प्रेमात पडल्यावर समोरच्याला प्रपोज करून ते सांगणंही महत्वाचं असतं. नाही तर आपलं प्रेम त्या व्यक्तीला कसं समजणार?
Proposing Obvious
Proposing ObviousSaam TV

प्रेम कधी, कसं आणि कुणावर होईल याचा काही नेम नसतो. प्रेमासाठी फक्त फेब्रुवारी महिना किंवा ठरावीक ऋतू नसतो. कॉलेजमध्ये असलेले तरुण तरुणी तर अनेकवेळा एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता प्रेमात पडल्यावर समोरच्याला प्रपोज करून ते सांगणंही महत्वाचं असतं. नाही तर आपलं प्रेम त्या व्यक्तीला कसं समजणार?

Proposing Obvious
Maldives India Relations : मालदीवच्या नवीन अध्यक्षांनी शपथ घेताच दाखवले रंग, भारतीय सैन्याला मायदेशी परतण्यास सांगितले

सध्या सोशल मीडिया आणि रिल्सच्या जमान्यात अनेक तरुण-तरुणी एकमेकांना प्रपोज करतात. मनातली भावना अवघ्या काही शब्दांत व्यक्त करतात. आय लव्ह यू हे तर अनेकांचे ठरलेले शब्द आहेत. बरेच जण फक्त हे तीन शब्द समोरच्या व्यक्तीला बोलून दाखवतात. मात्र आता आय लव्ह यू बोलून तुम्ही बोर झाले असाल तर आम्ही तुमच्यासाठी प्रेम व्यक्त करण्याकरता काही खास कोट्स आणले आहेत.

प्रत्येकवेळी तुला पाहतो, पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. स्वप्नातली परी तुच आहेस, तूच माझ्यासाठी सर्वस्व आहेस

माझ्या आयुष्यातला सोनेरी किरण म्हणजे तू, मला दिलासा देणारी सावली म्हणजे फक्त तू . म्हणून सांगतोय मला मनापासून आवडतेस तू

आजवर बोलता आलं नाही आज मी तेच बोलणार आहे, नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकंच तुला सांगणार आहे

तुझ्या सुरांची शपथ घेऊन सांगतो, तुझेच गीत मी गात आहे, तुच माझ्या जिवनाचा आधार आहेस.

श्वासात श्वास असेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही, हो म्हण आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन

या काही शायऱ्या किंवा कोट्स वापरून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला मनातील इच्छा बोलून दाखवू शकता. सतत आय लव्ह यू किंवा तू मला आवडते असं ऐकून किंवा बोलून तुम्हीही बोर झाले असाल तर ही टिप्स खास तुमच्यासाठीच आहेत.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. अशा पद्धतीने प्रपोज केल्यावर तुम्हाला होकार मिळेल असा दावा साम टीव्ही करत नाही.

Proposing Obvious
Kiran- Asmita Relation Rumors: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा व्हॅलेंटाईन डे दणक्यात, अस्मिता देशमुखसोबत करणार खास सेलिब्रेशन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com