Nashik Breaking News:  Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: शर्यतीचा थरार जिवावर बेतला! टांगा अंगावरुन गेल्याने युवकाचा मृत्यू; आयोजकांसह १२ जणांवर गुन्हा

Nashik Breaking News: दुर्घटनेत मृत्यू झालेले पोपट कचरु मुंजे हे टांगा शर्यतीचे शौकिन होते. तसेच सारूळ परिसरात सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. शर्यत शौकिनाचा शर्यतीमध्येच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, ता. २७ मे २०२४

शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा टांगा अंगावरुन गेल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोपट कचरु मुंजे ( वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव असून नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे टांगा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत पाहण्यासाठी पोपट कचरु मुंजे (रा सारुळ, ता. नाशिक) आले होते. यावेळी बाजूला उभे राहून शर्यत पाहत असतांना भरधाव टांगा अचानक त्यांच्या अंगावर आला. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्यावर व उजव्या कानावर जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले.

दुर्घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मुत्यू झाला होता. यावेळी शर्यतस्थळावरील ग्रामीण पोलीस काय करत होते? असा सवाल शर्यत शौकिनांमधून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आयोजक, गावच्या सरपंचासह 10 ते 12 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेले पोपट कचरु मुंजे हे टांगा शर्यतीचे शौकिन होते. तसेच सारूळ परिसरात सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे. टांगा शर्यत शौकिनाचा शर्यतीमध्येच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

बोल्डनेसचा तडका! 'या' भोजपुरी अभिनेत्रीच्या कातिल सौंदर्यावर नेटकरी झाले फिदा; पाहा व्हायरल फोटो

Ananya Pandey:'साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'; भरतनाट्यममुळे अनन्या पांडे ट्रोल, मिम्सचा पाऊस

Crime News : प्रसिद्ध मराठी गायकाकडून खंडणी वसूल, लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणाची दिली धमकी

Maharashtra News Live Update: पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT