Nashik News: Saamtv
महाराष्ट्र

Nashik Breaking News: धक्कादायक! नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मृत माशांचा खच, नागरिकांचा संताप; कारण काय?

Nashik News: नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात जवळपास दोन किलोमीटरपर्यंत लाखो मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. यावरुनच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १० जून २०२४

नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदीमध्ये दोन किलोमीटरपर्यंत मृत माशांचा अक्षरशः खच पाहायला मिळत असून ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात जवळपास दोन किलोमीटरपर्यंत लाखो मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन फुटून दूषित पाणी नदीत गेल्यामुळे हे मासे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मृत पावलेले मासे तरंगून आले असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जिवाणू देखील आढळून आले आहेत. या प्रकारामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री मुसळधार पावसात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहरातील काही भागासह ७० ते ८० गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर ते मुंबई विमानसेवा होणार सुरू

Maulana Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य; कार्यकर्त्यांनी मौलानाला स्टुडिओमध्ये चोपलं, VIDEO व्हायरल

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT