Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : पाण्याच्या टाकीवर मित्रांसोबत पतंग उडवत होता, अचानक तोल गेला, एकुलत्या एक पोराचा मृत्यू

Nashik News : दोन मित्रांसह पतंग उडवत होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकी परिसरातील डकवर असलेल्या पत्र्यांना तोडून खाली कोसळला.

Namdeo Kumbhar

तबरेझ शेख, साम टीव्ही

Nashik News : पतंग उडवताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरुन तोल जाऊन पडल्याने आठ वर्षीय चिमुकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशकातील द्वारका परिसरात घडली आहे. नक्ष संदीप बनकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. घटनेचे वृत्त पसरतात परिसरात शोककळा पसरली. भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे वृत्त कळताच परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

काठेगल्ली रवींद्र हायस्कूल परिसरातील पारस पार्क इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर नक्ष बनकर दोन मित्रांसह पतंग उडवत होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकी परिसरातील डकवर असलेल्या पत्र्यांना तोडून खाली कोसळला. खाली पडल्याचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कुटुंबीय आवाजाच्या दिशेने पळाले. नक्ष जखमी अवस्थेत खाली पडला असल्याचे आढळून आले. त्यांनी त्यास उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घटना घडली. उपचारादरम्यान रात्री त्याची प्राणज्योत मालवली. तो एकुलता एक असल्याने बनकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

खाली पडल्याने मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कुटुंबीयांचा एकुलता एक वारस गमावल्याने त्याच्या आईचीही तब्येत खालवली. अन्य कुटुंबीयांनी त्यांना सावरत धीर देण्याचा प्रयत्न केला. आईची परिस्थिती पाहून घटनास्थळावरील सर्वांचे डोळे पाणावले.

नक्ष याच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्याच्या मित्र परिवारांच्या कुटुंबियांमध्येही शौककळा पसरली. त्यांनी त्यांच्या मुलांना घेऊन नक्षचे घर गाठले. चिमुकल्या त्याच्या मित्रांनी त्याची अखेरची भेट घेत त्यास निरोप दिला. चिमुकल्या मित्रांच्या शेवटच्या भेटीच्या क्षणाने त्याचे मित्रांच्या कुटुंबीयांसह उपस्थित नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू ढासळले.

नक्ष बनकर रवींद्र विद्यालयात तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त शिक्षकांना कळताच शिक्षकही गहिवरले. हुशार आणि सर्वांशी मिळून असल्याने त्याच्या जाण्याने सर्वच हळवे झाले. शिक्षकांनी शाळेच्या सोशल मीडिया ग्रुपवर माहिती प्रसारित करत श्रद्धांजली अर्पण केली. अचानक त्याच्या मृत्यूचे दुःख सहन न होणारे असल्याने शाळेतर्फे एक दिवसाची सुट्टी घोषित करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT