A viral photo in the Ashok Kharat case reveals a new face, intensifying allegations of political and financial links. saam tv
महाराष्ट्र

भोंदू बाबा खरात आणि केसरकरांच्या फोटोमधील नामकर्ण आवारे कोण? खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नवे वळण मिळाले आहे. फोटोमधील एका व्यक्तीमुळे काळ्या पैशाच्या प्रकार उघकीस आला आहे. महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत.

Bharat Jadhav

  • खरात-केसरकर फोटोमुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट

  • ‘नामकर्ण आवारे’ नावाचा नवा चेहरा चर्चेत

  • काळा पैसा पांढरा करण्याचे आरोप

अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. त्याचदरम्यान या प्रकरणात नवा ट्विस्ट मिळाला आहे. खरात हा काळा पैसा व्हाईट करत असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी खरात प्रकरणात हा खुलासा केला आहे. दीपक केसरकर आणि अशोक खरात यांच्यातील बैठकीचे आणखी काही फोटो दाखवत त्यांनी या प्रकरणातील नवा खुलासा केला. त्यांच्या नव्या दाव्यामुळे शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर अडचणीत येतील अशी श्क्यता आहे?

'संजय राऊतांच्या कंपूकडून आपल्याला खरात प्रकरणात अडवलं जातंय. बदमान केलं जातंय. खरातच्या कोणत्याही कृत्यात आपला सहभाग नसल्याचं म्हणत केसरकरांनी सुषमा अंधारे यांचे आरोप फेटाळून लावले होते. त्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत धक्कादायक प्रकरण समोर आणलंय. खरात प्रकरणात याप्रकरणात एकट्या चाकणकर नाहीतर केसरकर यांची चौकशी व्हावी.

त्याचबरोबर आता याप्रकरणात जगदंब पतसंस्थेची एंट्री झाली आहे. अंधारे यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेल्या फोटोमध्ये जगदंब पतसंस्थेचा प्रमुख दिसत आहे. हा व्यक्ती काळा पैसा पांढरा करायचा, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

कोण आहे नामकर्ण एकनाथ आवारे?

नामकर्ण एकनाथ आवारे हा दीपक केसरकर आणि अशोक खरात यांच्या अनेक फोटोमध्ये दिसत आहे. संगमनेर, सिन्नर आणि तेथील आजूबाजूच्या वाड्यामध्ये माहिती घेतली असता हा व्यक्ती अनेक बड्या नेत्यांचे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करतो, अशी माहिती तेथील लोकांनी दिल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. पोलिसांनी याला खरात प्रकरणी रेकॉर्डवर आणणं गरजेचे असल्याचं म्हणत हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय, असा सवाल अंधारे यांनी केलाय.

केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं. शालेय शिक्षण मंत्र्याच एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय? कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा सारखा दिसतोय? या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात? असे सवाल अंधारे यांनी केसरकरांना केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT