भोंदू खरातच्या पापाचा घडा आता पूर्ण भरलाय.वासनेचा नंगा नाच करताना खरात आपल्या ऑफीसमध्ये कोडवर्डस् वापरायचा. 150 हून अधिक महिलांचं लैगिक शोषण करणाऱ्या आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या खरातचे कोडवर्डस् SIT च्या हाती लागलेत. यात एक आहे. झुंबर पॅटर्न. कसा वापरायचा हा कोडवर्ड पाहूयात.
खरात केबिनमध्ये महिलांचे लैगिक शोषण करायचा.शोषण करण्याआधी तो केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबराचा दिवा बंद करायचा. या झुंबराचा दिवा बंद असेपर्यंत केबिनमध्ये कोणालाही प्रवेश नसायचा. कार्यालयात काम करणाऱ्यांना या कोडवर्डची माहिती होती, असं आता तपासात समोर आलयं.
विशेष म्हणजे खरात महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी दांपत्यासमोर पतीला सांगायचा की, तुझ्या यशामागे तुझ्या पत्नीचा मोठा वाटा आहे'. त्यामुळे महिलांच्या मनात सहानुभूती आणि विश्वास निर्माण व्हायचा. इतकचं काय तर खरात अंकशास्त्राचा आधार घेतल्याचं भासवून तरुण मुलींचे संबंध बड्या अधिकाऱ्यांशी आणि उद्योगपतींशी जुळवून द्यायचा.
खरात नाशिकमध्ये हाय-प्रोफाईल रॅकेट चालवत असल्याचाही संशय निर्माण झालाय. 10 गुन्हे दाखल झाल्यामुळे खरातच्या शिवानिका संस्थेचे बँक अकाऊंट सील करण्यात आलेत. तर SIT नंही खरातच्या मालमत्तेची माहिती मागवली असून खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. खरातच्या वासनेचा बाजार जरी उद्धवस्त झाला असला तरी एसआयटी तपासात आता खरातशी संबंधित कुठल्या बड्या धेंडांचे चेहरेही समोर येतायेत हे पहावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.