Unseasonal Rain  Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; येवल्यात पत्र्याच्या शेडखाली एकजण दबला, अमरावती बाजार समितीत शेतमाल भिजला

Nashik News : अवकाळी पावसाची रोज हजेरी लागत आहे. जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या तालूक्यात पावसाची हजेरी लावत आहे. आज येवला शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे/ अमर घटारे 
नाशिक/ अमरावती
: राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान होत आहे. वादळी वाऱ्याचा देखील जोरदार तडाखा बसत असल्याने घरांची पडझड तसेच झाडे उन्मळून पडत आहेत. दरम्यान आज दुपारी नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे येवला शहरात पत्र्याचा शेड कोसळला असून यात एकजण दबला गेल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची रोज हजेरी लागत आहे. जिल्ह्यातील कोणत्या ना कोणत्या तालूक्यात पावसाची हजेरी लावत आहे. आज येवला शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील गंगादरवाजा बागात असलेल्या बँक ऑफ इंडिया समोर असलेले पत्र्याचे शेड कोसळले. त्याखाली दबून एक जण  जखमी झाला आहे. रोज होत असलेल्या पावसामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याने कांदा भिजत असल्याने नुकसान होण्याची भिती व्यक्त केली आहे.

बाजार समितीतील शेतमाल भिजला 

अमरावती : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा मोठा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजला आहे. बाजार समिती शेड असूनही या शेडचा वापर फक्त व्यापारांचा शेतमाल साठवण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उघड्यावर माल ठेवून विक्री करावी लागते. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हिंगोलीत पावसाची तुफान हजेरी,रस्त्यावर साचले पाणी
हिंगोली
: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्याच्या हिंगोलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी चार वाजता पाऊस तुफान बरसला आहे. हिंगोलीच्या माळहिवरा, माळशेलु खंडाळा, भांडेगावसह जयपूर परिसरात पाऊस कोसळला आहे. तब्बल पाऊण तास चाललेल्या पावसामुळे रस्त्यावर व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला मात्र हळद उत्पादक शेतकऱ्यांची मात्र धावपळ झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Hair Home Remedies: केस खूप पांढरे झालेत? शाईनपण गेली? मग वापरा 'हे' खास हेल्दी तेल

Maharashtra Live News Update : नागपुरात बालाघाट मेमू गाडी रुळावरून घसरली, मोठा अपघात टळला

इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार? युद्धावरून मुस्लिम देशांत खलबतं

Chanakya Niti: आयुष्यात या ४ प्रकारचे मित्र कधीच देत नाही दगा, चाणक्यांनी सांगितलं गुपित

Iran–Israel–US conflict: एक महिन्यानंतरही युद्ध सुरूच; आखाती युद्धामुळे जगाची इंधनकोंडी

SCROLL FOR NEXT