Nashik Satana Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident News: भरधाव टिप्परने कारला उडवलं, देवदर्शनाहून परतणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी

Nashik Satana Accident News: नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शन करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे, साम टीव्ही

Nashik Satana Accident News: नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शन करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला. वाळूने भरलेल्या ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही दुर्देवी घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

योगेश केदा जाधव (वय २० रा.पिंपळेश्वर), ललित पांडुरंग जाधव (वय ४२ रा. सटाणा) अशी मृतांची नावे आहेत. तर कारमधील अन्य पाच जण सिंधुबाई रोहीदास पवार (वय- ६०), पूजा नरेंद्र सोनवणे (वय २४), नरेंद्र अभिमन सोनवणे (वय ३०) या पती पत्नीसह स्वामी ललित जाधव (वय ८), साक्षी नंदकिशोर सोनवणे (वय १६) हे गंभीर जखमी असून तिघांवर सटाणा येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सटाणा शहरातील पिंपळेश्वर भागात राहणारा योगेश केदा जाधव हा आपल्या आराई येथील मित्र प्रविण राजेंन्द्र गांगुर्डे यांची इर्टिगा कार घेऊन नातेवाईकांसह दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दर्शनाला गेला होता.

सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सटाणा शहराकडे परतीच्या प्रवासात असतांना सटाणा शहराकडून देवळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा वाळूने भरलेल्या ट्रकने तुर्की हुडी जवळ त्यांच्या कारला जब्बर धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारचालक योगेश योगेश (दादु) जाधव आणि ललित यांच्या डोक्याला जबर (Accident) मार लागला. या दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले.

तर कारमधील इतर पाचजण जखमी झाले. जखमींमध्ये ८ वर्षीय स्वामी जाधव याची प्रकृती चिंताजनक असून त्याला नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. देवदर्शनावरून परतत असताना अचानक एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Banjara Community : अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आक्रमक; एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

SCROLL FOR NEXT