Nashik Chandwad Manmad Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Accident : भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला, विटांखाली दबून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

Nashik Chandwad Manmad Accident News : चांदवड–मनमाड रोडवर सिमेंट विटांचा ट्रक पलटी झाल्याने एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली.

Alisha Khedekar

  • चांदवड–मनमाड रोडवर सिमेंट विटांचा ट्रक पलटी

  • महिला व दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

  • मृत व जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर

  • पोलिसांचे तातडीचे मदतकार्य, वाहतूक सुरळीत

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकच्या चांदवड-मनमाड रोडवर दुर्दैवी अपघात झाला आहे. सिमेंटच्या विटा वाहून नेणारा पलटी झाल्याने एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील हे तिघे असल्याचे वृत्त समोर आले आहे. सदर घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक (विटा) घेऊन एक ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. दरम्यान, हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले.

अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) कैलास वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT