Nahsik Accident PSI Death साम टीव्ही
महाराष्ट्र

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Nashik accident Death news : नाशिकच्या नांदुरी परिसरात नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकाला भरधाव कारने धडक दिली. या दुर्घटनेत पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Nahsik Accident PSI Death : नाशिकच्या नांदुरी (सप्तशृंगगड) परिसरात भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकाला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. या अपघातात ११ हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पोलीस दल आणि परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. नांदुरी गावातील अभोणा चौफुलीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता, त्यासाठी परिसरात बॅरिकेटिंगही करण्यात आले होते.

हा बंदोबस्त करून पोलीस आणि संबंधित पथक निघाले असताना, वणीच्या पुढे नांदुरीकडे जाणाऱ्या मार्गावर एका भरधाव कारने नियंत्रण सुटल्याने बंदोबस्तावरील पोलिसांना आणि तिथे उपस्थित असलेल्यांना जोरदार उडवले. हा अपघात इतका भीषण होता की, यात अनेक जण गंभीर जखमी झाले.

PSI विजय गायकवाड यांचे निधन

या अपघातात गंभीर जखमी झालेले वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ते कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

अपघातानंतर घटनास्थळी एकच तारांबळ उडाली आणि नागरिकांचा रोषही पाहायला मिळाला. तात्काळ सर्व जखमींना उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या काहींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

चालक ताब्यात, पोलिसांकडून गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित भरधाव कारच्या चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT