Accident News
Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: मोठी बातमी! नाशिकमध्ये भीषण अपघात, आयशरने गाड्यांना उडवले

Gangappa Pujari

Nashik News: नाशिकच्या येवला येथील विंचूर चौफुलीवर भीषण अपघात झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. नाशिकच्या मनमाड- येवला महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका आयशरने अनेक गाड्यांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. (Accident News)

समोर आलेल्या माहितीनुसार, विंचुर चौफीलीवर या अपघातानंतर मोठा गोंधळ झाला आहे. या घटनेतील जखमींबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र हा अपघात मोठा असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Nashik)

दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर सकाळीही एक भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर १२ महिला जखमी झाल्या होत्या. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local News : लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

Today's Marathi News Live : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Wooden Comb: केस विंचरण्यासाठी लाकडी की प्लास्टिकचा कंगवा वापरावा?

Eastern Express Highway : ईस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी, चाकरमान्यांना मनस्ताप

Kalyan News : सोशल मीडियावर 'गे' चिडवलं; जाब विचारायला गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT