Ravikant Tupkar : 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त रविकांत तुपकर यांच्या पत्नीची फेसबूक पोस्ट, मनातील भावना केल्या व्यक्त...

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सध्या ते अकोला कारागृहात अन्नत्याग आंदोलन करत आहेत.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSAAM TV
Published On

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना आत्मदहन आदोलनादरम्यान पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते अकोला कारागृहात अन्नत्याग आंदोलन करत आहेत. बुलढाण्यातील आंदोलनावेळी तुपकर यांच्यासह इतर 25 कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान आज आज 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र खूपच व्हायरल होत असून लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Ravikant Tupkar
Nandurbar: याला म्हणायचं नाद! नवरा-नवरीची लग्नमंडपात चक्क हेलिकॉप्टरने एन्ट्री, आगळ्यावेगळ्या लग्नाची गावभर चर्चा

शर्वरी तुपकर यांचं पत्र

"प्रिय रविकांत, कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण तु चढलास.. एकदाच नाही तर अनेकदा.. वारंवार... कधी मुख्यमंत्र्यांची सभा उधळली म्हणून.. कधी जिल्हा बँकेचे पिककर्जाचे रेकॉर्ड जाळले म्हणून.. तर कधी स्वतःला जमिनीत गाडून घेतले म्हणून.. किती किती म्हणून सांगु... (Latest Marathi News)

व्यवस्थेशी अन्यायाशी तुझा कायमच संघर्ष आणि त्यातून मग पोलीस केस आणि कोठडीतला मुक्काम ठरलेला... मग माझी धावपळ ठरलेली... तु समजावून सांगितलेलं संघर्षाच कारण कोर्टाला समजावून सांगण्याची.. तुझी बाजू मांडून कायद्याच्या कचाट्यातून तुला सोडवून आणण्याची... गेली १७-१८ वर्ष हे असचं सुरू आहे.बदल फक्त एकच.. पुर्वीची ॲड. शर्वरी सावजी नंतर ॲड. शर्वरी रविकांत तुपकर झालेली.

Ravikant Tupkar
Bhimashankar jyotirlinga : महाराष्ट्रातलं 'भीमाशंकर ज्योतिर्लिंग' आसाममध्ये; CM हिमंत विश्व शर्मांच्या दाव्यानं वादाची ठिणगी

तुझ्या प्रत्येक आंदोलनातून तू कळत गेला आणि भावबंध कधी जुळले ते कळलचं नाही.. पण तरीही तुझं ध्येय तुझ्या पुढे स्पष्ट होत.. आणि तुझा निर्धारही... अविरत संघर्ष करण्याचा.. आणि माझा निर्धारही.. तुला जेल मधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा...

आज परत उभी आहे मी कोर्टापुढे.. तुझ्या आत्मदहन आंदोलनाची पार्श्वभूमी कोर्टाला समजवण्यासाठी.. पोलिसांनी अमानुषपणे केलेला लाठीचार्ज कोर्टाला दाखविण्यासाठी.. आणि परत एकदा तुला जेलमधून बाहेर काढण्यासाठी...

असचं तर फुलतयं आपल्यातील प्रेम.. आणि अधिकाधिक घट्ट होतायेत आपल्यातील भावबंध... असाचं तर साजरा होत आलायं आपला व्हॅलेंटाईन.. Happy valentine's day dear..."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com