Nandgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Nandgaon Accident : भरधाव कार दुचाकीला धडकली, भीषण अपघातात पतीसह पत्नीचा मृत्यू

Nashik News : बाहेर गावी गेलेले भाऊसाहेब व लंकाबाई माळी हे दुपारी दुचाकीने घराकडे जात होते. याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पती- पत्नीचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या नांदगाव- चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात आज दुपारच्या सुमारास दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जाणारे पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील तीन ते चारजण जखमी झाले असून जखमींना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील नाग्या- साक्या येथील रहिवासी भाऊसाहेब माळी व त्यांच्या पत्नी लंकाबाई माळी असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. बाहेर गावी गेलेले भाऊसाहेब व लंकाबाई माळी हे दुपारी दुचाकीने घराकडे जात होते. याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पती- पत्नी हे फेकले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

धडकेनंतर दोन्ही वाहने गेली नाल्यात 

सदर अपघातात पती- पत्नीचा मृत्यू झाला असून कारमधील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचत त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान अपघातानंतर दोन्ही वाहने बाजूच्या नाल्यात फेकली गेली. यात दुचाकी एका बाजूला गेली तर दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार देखील रस्त्याच्या खाली नाल्यात उतरली होती. 

काँक्रिटीकरण झाल्याने भरधाव जातात वाहने 

दरम्यान नांदगाव- चाळीसगाव या रस्त्याचे नूतनीकरण करत त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने या रस्त्यावरून जाणारे वाहन चालक भरधाव वेगाने जात असतात. यामुळे बऱ्याचदा वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. यातूनच आज कार व दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय”

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

SCROLL FOR NEXT