Nashik Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Accident : कुटुंबावर काळाचा घाला; नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Accident News : नाशिकमधून भीषण अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या (Nashik) इगतपुरीजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या पंढरपूरवाडी येथे अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृतांमध्ये २ पुरुषांसह १ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

अपघात कसा झाला ?

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या पंढरपूरवाडी अपघाताची घटना घडली आहे. भीषण अपघातात एकाच कुटूंबांतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात २ पुरुषांसह १ महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.

भरधाव कारचे पुढील टायर फुटल्याने कार पलीकडील लेनवरून जाणाऱ्या क्रेनवर जावून आदळल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

अतिवेगाने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; उड्डाणपुलावरुन पडून मृत्यू

वर्धा सेवाग्रामकडून वर्ध्याकडे अतिवेगात असलेली दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. यात दुचाकीवरील (Wardha News) तरुण पुलाखाली पडल्‍याने त्‍याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक उराडे (वय ३१) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी (Accident News) अपघातस्थळी जात पंचनामा करुन नोंद घेतली.

वर्धा येथील आदिवासी कॉलनीतील रहिवासी प्रतिक उराडे हा त्याच्या दुचाकीने सेवाग्राम येथे कामानिमित्त गेला होता. काम आटोपून तो दुचाकीने परत येत असतानाच सेवाग्राम उड्डाणपुलावर वेगात असलेल्या दुचाकीवरुन त्याचे नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी थेट पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. जोरदार धडकेत प्रतिक पुलाखाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT