Nashik Accident News Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्याला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Nashik Accident News: नातूला घराबाहेर फिरवत असताना माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात. अतिदक्षता विभागात गावित यांच्यावर उपचार सुरू.

Bhagyashree Kamble

  • माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात

  • भरधाव चारचाकीनं दिली धडक

  • नाशिकच्या खासगी रूग्णालयात गावित यांच्यावर उपचार सुरू

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार निर्मला गावित यांचा मोठा अपघात घडला आहे. आपल्या नातूला घराबाहेर फिरवत असताना मागून आलेल्या एका चारचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी निर्मला गावित या घराबाहेर नातूला फिरवत होत्या. रस्त्याच्या कडेनं गावित चालत होत्या. दरम्यान, गावित यांच्या मागून एक भरधाव चारचाकी आली. भरधाव चारचाकीनं निर्मला गावित यांना जोरदार धडक दिली. या धडकेत निर्मला गावित गंभीररित्या जखमी झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गावित यांना नाशिकमधील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गावित यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हा भंयकर अपघात काल घडला. या दुर्घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओत माजी आमदार निर्मला गावित, त्यांचा नातू तसेच आणखी एक महिला दिसत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. गावित कुटुंबियांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वाहनचालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स संपला,अखेर ठाकरेंच्या युतीचा मुहुर्त ठरला

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

मुंबईत मोठा भाऊ कोण? जागावाटपावरून महायुतीत तणाव? महापालिकेसाठी मित्रपक्षांचा प्लान की आणखी काही....

तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

SCROLL FOR NEXT