Nashik Accident Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात; वाहन थेट खोल दरीत कोसळलं, ५ जणांचा मृत्यू | VIDEO

Nashik Accident News : शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. कंटेनर थेट दरीत कोसळल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील दोघांचा समावेश आहे

Sandeep Gawade

शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट कसारा घाटातील खोल दरी कोसळला होता. कंटेनरमधून प्रवास करणारे पाच प्रवासी अडकून कडले होते. मात्र यातील पाचही जणांचा मृत्यू झाला असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. अजून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.

श्लोक जायभाय (वय 9, रा. नालासोपारा), अक्षय गुगे (वय 30, रा . नवी मुंबई ), अनिकेत वाघ (वय 21 रा .सिन्नर) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यात मुंबईतील दोघांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कसारा घाटातील बलगर पाॅईटजवळ हा भीषण अपघात झाला होता. कंटेनर ५ प्रवाशांना घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान कंटनेर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात आला होता. या ठिकाणी घाट रस्त्याला मोठा उतार आहे. त्यामुळे अंदाज न आल्यामुळे चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील ५ ही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील दोघांचा समावेश असून एका ९ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले आहे. यात आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT