Savitri River : रायगड हादरलं! महाबळेश्वरवरुन दर्शनाला आले, सावित्री नदीमध्ये पोहायला गेले, तिघांचा बुडून मृत्यू

Savitri River : महाबळेश्वरच्या तिघांचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू, धक्कादायक घटनेनं रायगड हादरलं
drowning
drowning Saam Digital
Published On

Savitri River Raigad Maharashtra : सावित्री नदीमध्ये पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झालाय. या घटनेमुळे रायगड हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे दर्गाच्या ठिकाणी दर्शनाला आले होत, त्यावेळी पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. ते पोहायला सावित्री नदीपात्रात उतरले, पण माघारी परतले नाही. बचाव पथकाने त्यांचा शोध घेतला. पण त्यांचे मृतदेहच मिळाले. या दुर्दैवी घटनेमुळे रायगडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सावित्री नदी किनारी सव गावातील दर्गाच्या ठिकाणी तीन जण दर्शनासाठी आले होते, त्यावेळी ते पोहायला उतरले अन् बुडून मृत्यू झालाय, अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्या तीन तरुणाची नावे दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद आणि जाहिद अशी आहेत. हे सर्व राहणारे महाबळेश्वर येथील आहेत.

drowning
Nagpur News: नसतं धाडस जीवावर बेतलं! स्टंटबाजी करायला गेला अन् घडलं भयंकर; तरुणाचा बुडून मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

आज सकाळी हे तिघेजण महाबळेश्वर गवळी मोहल्ला येथून सव येथील दर्गात दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते पोहण्यासाठी सावित्री नदीपात्रात उतरले. अचानक पाहण्याचा प्रवाह वेगवान झाला. त्यामध्ये तिघेही बुडाली. याबाबतची माहिती बचाव पथकाला दिली. त्यांनी तिघांचा शोध घेतला, दोन तास शोध घेतल्यानंतरही एकालाही वाचवण्यात यश आले नाही. तिघांचे मृतदेह बचाव पथकाला मिळाले आहेत. मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे. महाबळेश्वर येथील गवळी मोहल्ला गावावर शोककळा पसरली आहे. रायगडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते.

drowning
Nandurbar Accident : भयंकर! चालकाला हृदयविकाराचा झटका, अलिशान कारने तिघांना चिरडलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com