Maharashtra Nashik Police Bribe Case News  AI Image
महाराष्ट्र

Bribe Case : पोलीस विभागात खळबळ! कर्मचाऱ्याला ४०००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

Nashik Ahilyanagar Bribe Case News : वाळू वाहतुकीला अडथळा न आणण्यासाठी दरमहा ४० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यातील हवालदार अशोक शिंदे याला देर्डे फाटा येथे नाशिक एसीबीने रंगेहात पकडले.

Alisha Khedekar

वाळू वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता ती सुरू ठेवण्यासाठी दरमहा 40 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. नाशिक येथील एसीबीच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा येथे सापळा रचून ही कारवाई केली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शिंदे असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तो शिर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. वाळूची वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दर महिन्याला 40 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

या लाचेच्या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा लावण्याची तयारी केली. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील देर्डे फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने हवालदार अशोक शिंदे याला रंगेहात पकडले.

मात्र, पथकाच्या कारवाईची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओही आता समोर आला असून, त्याची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात एसीबीकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fridge Cleaning Tips: फ्रिजच्या दारातील रबर काळाकुट्ट झालाय? चिंता सोडा, फक्त ही 1 ट्रिक वापरून रबर दिसेल नव्यासारखा चमकदार

Maharashtra News Live Update: ऊस दर ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस सुरुवात

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय

घरच्या घरी सिल्क साडी धुवायची कशी?

Ind vs NZ 2nd Test: पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या ५ विकेट्स, ब्लंडेल- फिलिप्सने डाव सावरला, आकाश दीपची भेदक गोलंदाजी!

SCROLL FOR NEXT