Nashik ACB Raid
Nashik ACB Raid Saam TV
महाराष्ट्र

आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; रोकड मोजण्यासाठी मागवल्या मशीन

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल याच्या घरांवर छापेमारी करत नाशिक (Nashik) अँटी करप्शन विभागाने काल मोठी कारवाई केली होती. याच कारवाई अंतर्गत बागुल यांच्या नाशिक, पुणे, मुंबईसह धुळ्यातील घरांवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) छापेमारी सुरु केली आहे. (Executive Engineer, Tribal Department)

या छापेमारीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे, एका आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरी केलेल्या छापेमारीमध्ये करोडो रुपयांची रोकड सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर या अधिकाऱ्याची इतर घरे आणि लॉकरची मोजदात अद्याप झालेली नसून रोकड, सोने, बेनामी संपत्ती अशी कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा ACB ला संशय आहे.

पाहा व्हिडीओ -

तसंच दिनेश कुमार बागुल याच्याशी (Dinesh Kumar Bagul) संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. या अधिकाऱ्याच्या घारामध्ये एवढी रोख रक्कम सापडली आहे की, ती रोख रक्कम मोजण्यासाठी पैसे मौजण्याची मशीन मागवण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण -

आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल याला तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी ही लाच मागितली होती. दरम्यान पोलिसांना दिनेशकुमार बागुल याची नाशिकमध्ये शेकडो कोटीची मालमत्ता असल्याचा संशय आल्याने त्यांनी बागुल याची चौकशी केली असता आता त्याच्या घरामध्ये करोडो रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Maharashtra Rain News: राज्यातील पावसाची खबरबात! कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर कुठे पिकांनाही फटका

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

SCROLL FOR NEXT