Nashik News
Nashik News Saam TV
महाराष्ट्र

मोबाईलचा अतिवापर जीवावर बेतला; चौथीत शिकणाऱ्या मुलाने केली आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक: घरात कोणी नसतांना चौथीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना पंचवटी भागातील अवधूत वाडी इथं घडली आहे. मोबाईलवर नेहमी गेम खेळायचं व्यसन त्याला लागल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याच अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिकच्या पंचवटीत अवधूत वाडीत राहाणारा आर्यन या 9 वर्षीय मुलानी घरात कोणी नसतांना आर्यन याने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरा आर्यनची आई कामावरून घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहे.

आर्यनचे वडील हे शेती कामानिमित्त सटाणा इथं राहत असून आई खाजगी दवाखान्यात तर भाऊ मॉलमध्ये कामाला आहे. आर्यन हा नेहमी घरी एकटाच असल्याने त्याला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती. तर कधी टीव्ही पाहण्याचा छंद होता. आणि यामुळेच आर्यनने आत्महत्या केल्याची खंत आर्यच्या आईने व्यक्त केली आहे.

एकूणच या घटनेनंतर संपूर्ण नाशकात एकच खळबळ उडाली असून चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलांनी मोबाईलच्या अती वापरामुळे आत्महत्या केल्याने पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच मुलांना मोबाईल पासून लांब ठेवा असं आव्हान आर्यनच्या आईने केले आहे. अशीच एक घटना दोनच दिवसंपूर्वी सिन्नर इथं घरच्यांनी मित्राच्या वाढदिवसाला जाऊ दिले नाही म्हणून पंधरा वर्षाच्या मुलाने रागात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तद्नंतर शहरात ही घटना घडल्याने मुलांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

SCROLL FOR NEXT