नाशिक: 5 मेडिकलची दुकानं तोडून हजारो रुपयांची रोकड लंपास; चोरटे CCTV त कैद... अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

नाशिक: 5 मेडिकलची दुकानं तोडून हजारो रुपयांची रोकड लंपास; चोरटे CCTV त कैद...

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: नाशिकरोड (Nashik Road) परिसरात घरफोडी, दुचाकी चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे आदी प्रकार सातत्याने सुरू असून अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी परिसरातील पाच मेडिकल दुकाने (Medical Store) फोडून हजारो रुपयांची रोकड चोरुन (Robbery) नेल्याचा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आता चोरट्यांनी मेडिकल दुकानावर आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे व्यावसायिक व व्यापार्‍यांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे. (NASHIK: 5 medical shops were smashed and thousands of rupees in cash were stolen; Captured by stolen CCTV ...)

हे देखील पहा -

दुचाकी चोरणारे अद्याप पोलिसांच्याहाती लागलेले नाही. त्याचप्रमाणे घरफोड्या करणारेसुद्धा हाती लागलेले नाही. रात्रीच्या वेळी पोलीस (Nahsik Police) बंदोबस्त नसल्याने व्यापारीवर्ग हैराण झालेला आहे. नाशिकरोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच मेडिकलचे दुकाने फोडले. त्यात महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलसमोरील त्र्यंबक कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या तीन मेडिकलमधून चोरट्यांनी रक्कम चोरून नेली. पी. के. आयुर्वेदिक या मेडिकलमधून 18 हजार रुपये रोख, पी.के. हेल्थकेअर मधून दहा हजार रुपये रोख, त्याचप्रमाणे नवकार मेडिकल, सागर मेडिकल व आणखी एका मेडिकलमधून चोरट्यांनी काही प्रमाणात रक्कम चोरली असल्याचे समजते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT