Nashik Municipal Corporation Election News saam tv
महाराष्ट्र

Nashik: नाशिकमध्ये उपमहापौरासह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत; फोडाफोडीला वेग!

महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नाशिकमध्ये परत एकदा फोडाफोडीला वेग आला

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिकः महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नाशिकमध्ये (Nashik) परत एकदा फोडाफोडीला वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे उपमहापौरासह (BJP) 4 नगरसेवक शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्याचे समजत आहे. मुंबईत (Mumbai) आज मातोश्रीवर हे नगरसेवक (Corporator) शिवबंधनात अडकणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. (Nashik 4 BJP corporators including Deputy Mayor are Shiv Sena)

मुंबई महापालिकेच्या कारभारावरून जोरदार टीका करण्यात आली होती. या आरोपाला शिवसेनेने हे राजकीय उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. पुढील आगामी काळात नगरसेवकांच्या फोडाफोडीला परत एकदा वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातले आहे. शिवसेनेने सुनील बागुल यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यांच्याच खांद्यावर महापालिका निवडणुकीची धुरा येणार असल्याची चर्चा आहे.

हे देखील पहा-

मात्र, त्यांच्या मातोश्री आणि पुत्र हे सध्या भाजपमध्ये आहेत. बागुल यांच्या मातोश्री भिकुबाई बागुल या उपमहापौर आणि पुत्र मनीष हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. हे दोघेही आता शिवसेनेमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. वसंत गिते सध्या शिवसेनेत आहेत. मात्र, त्यांचे पुत्र आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे भाजपचे नगरसेवक आहेत. ते देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे सातपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर याअगोदर निवडून आलेली एक नगरसेविका शिवबंधन बांधणार असल्याचे समजत आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब यांनी ही राजकीय सूत्रे हलवले असून, निवडणुकीच्या तोंडावर याचा भाजपला चांगलाच फटका बसणार आहे. सध्या नाशिक महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर शिफारस अहवाल 2 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. यानंतर 10 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.

यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत काही निर्णय झाला, तर परत प्रवर्ग निहाय आरक्षण, स्त्री- पुरुष वर्गवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर देखील हरकती मागवण्यात येणार आहेत. यावर परत सुनावणी होणार आहे. पालिकेची मुदत 15 मार्च रोजी संपणार आहे. यामुळे निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

SCROLL FOR NEXT