Beed Breaking: जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये गोळीबार; घटनास्थळी पोलीस दाखल
Beed Breaking: जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये गोळीबार; घटनास्थळी पोलीस दाखलविनोद जिरे

Beed Breaking: जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये गोळीबार; घटनास्थळी पोलीस दाखल

जमिनीच्या खरेदी-विक्री वादावरून गोळीबार झाल्याचा अंदाज
Published on

बीड : बीडमध्ये गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. चक्क पोलीस (Police) प्रशासनाला आव्हान देत जिल्हाधिकारी कार्यालयातमध्ये असणाऱ्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये, जमिनीच्या वादातून गोळीबारात करण्यात आला आहे. यामध्ये एका गटातील तरुणाला पायाला गोळी लागली असून अन्य एक जण जखमी झाला आहे.

हे देखील पहा-

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये, सकाळी 11 च्या दरम्यान हा गोळीबार (Firing) झाला आहे. यामध्ये सतीश क्षीरसागर याच्या पायाला गोळी लागली असून फारुक सिद्दीकीच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. दरम्यान प्राथमिक माहितीवरून, हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला असून फायर झालेल्या राऊंडचं एक खाली के सापडले आहे. त्याचबरोबर नेमकं कुणी गोळीबार केलाय? मुख्य कारण काय आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Beed Breaking: जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये गोळीबार; घटनास्थळी पोलीस दाखल
Russia Ukraine War: युक्रेनचा दावा ! रशियाचे 30 टँक, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर उद्धवस्त

सध्या सीसीटीव्हीची (CCTV) पाहणी करत असून त्या आधारावर आरोपींचा (accused) शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. दरम्यान सध्या आरोपींच्या शोधासाठी एक पथक पाठविण्यात आले आहे. अशी माहिती पोलिस (Police) अधीक्षक राजा स्वामी यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. तर गोळीबाराच्या थराराने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चक्क ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे. महत्वाचे अधिकारी बसतात, त्याचे कार्यालयांमध्ये खुलेआम गोळीबार झाल्याने, बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com