Tamasha Collection News: प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटीलने मार्केट काबीज केलं असलं तरी, तमाशावर मात्र त्याचा काही परिणाम झालेला नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तमाशाच्या पंढरी अशी ओळख असलेल्या नारायणगावात एकाच दिवशी कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
नारायणगावात 45 पेक्षा आधिक फडांमध्ये एकाच दिवशी 10 कोटीची उलाढाल झाली आहे. या एका दिवसात 100 पेक्षा अधिक तमाशांचे करार पार पडले. यामुळे गावजत्रांमध्ये तमाशाला अजूनही चांगली मागणी असल्याचे दिसतंय. अनेक गावांचे पुढारी गुढीपाडव्याला मोठ्या संख्येने नारायणगावात दाखल झाले आहे.
गौतमीच्या अदाकारीचा तमाशावर परिणाम नाही
एकीकडे गौतमी पाटीलच्या आदाकारीने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. मात्र गौतमीच्या आदाकारीचा तमाशा क्षेत्रावर कुठलाही परिणाम नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान गावगाड्यावरची तरुणाई गौतमीमुळे भरकटत असून गौतमीने आश्लिलता दाखवत लोकप्रियता मिळवली असा आरोप तमाशा कलावंतांनी केला आहे.
तसेच तमाशा कलावंतांनी पेशवाईपासूनच लोकांना जगण्याची उमेद देत लोककला जपली आणि टिकवली, त्यामुळे आजही तमाशाच्या कलेला लोकांनी डोक्यावर घेतले आहे असे मत तमाशा कलावंतांनी व्यक्त केले आणि तमाशा सह्याद्री सारखा उभा आहे असं म्हणत तमाशा कलावंतांनी गौतमीला खडेबोल सुनावले आहेत. (Latest Marathi News)
तमाशाला महागाईचा फटका
आखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव आणि फडमालक मोहित नारायणगावकर यांनी यावेळी तमाशा कलावंतांच्या अडचणी मांडल्या. ते म्हणाले, वाढत्या महागाईचा फटका तमाशाला बसला आहे. अनेक तमाशा फड कर्जाचा सामना करत आहेत. मात्र असे असले तरी गौतमी पाटीलच्या आदाकारीचा तमाशावर कोणताही परिणाम झालेला नाही असे दिसत आहे.
लोककला टिकवण्यासाठी गावकरी पुढे आहेत. तमाशा कलावंतांनीच लोककला जपली आणि ती टिकवली आहे असे देखील ते म्हणाले. स्टेज शोमधून तरुणाई भरकटायला नको, चार भिंतीच्या आत व्हावं ते गौतमीने स्टेजवर आणलं असा आरोप करत त्यांनी गौतमी पाटीलला खडेबोल सुनावलेत.
लोककला जपण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार
गावगाड्यावरच्या जत्रा, यात्रांमध्ये महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाचा फड लावण्यासाठी अनेक गावांचे पुढारी तमाशाची पंढरी असलेल्या नारायणगावातदाखल झाले आहेत. आज एकाच दिवसात 100 पेक्षा अधिक तमाशांचे करार होऊन 10 कोटींची उलाढाल झाली आहे. वाढत्या महागाईचा शेतीच्या नुकसानीचा परिणाम तमाशा फडावर झाला असला तरी गावगाड्यावर लोककला रंगावी यासाठी गावकारभारी पुढाकार घेत आहेत.
Edited By - Chandrakant Jagtap
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.