नारायण राणे यांचा रत्नागिरी न्यायालयने जामीन अर्ज फेटाळला  Saam Tv
महाराष्ट्र

नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर...

नारायण राणे यांच्या प्रकरणावर आणि जामीन अर्जावर महाड न्यायालयात सुनावणी झाली असून. या न्यायाधीशांनी राणे यांना अखेर जामीन मंजूर केला आहे. तसेच, त्यांची अटक हि बेकायदेशीर असल्याचा निकाल कोर्टाकडून देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात लगवण्याच्या वक्तव्यावरून आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांच्या प्रकरणावर आणि जामीन अर्जावर महाड न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी राणे यांना अखेर जामीन मंजूर केला असून. त्यांची अटक हि बेकायदेशीर असल्याचा निकाल कोर्टाकडून देण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यामार्फत ऍड.अनिकेत निकम यांनी बाजू मांडली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले होते व मुख्यमंत्री पदाच्या गरीमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा युक्तिवाद सरकारी वकीलांमार्फत करण्यात आला होता. राज्य सरकारच्या वतीने वकील भूषण साळवी यांनी युक्तिवाद केला होता.

त्यामुळे अश्याच पद्धतीचे विधान पुन्हा केले जाण्याची शक्यता गृहीत धरून राणेंना सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, नारायण राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद यावेळी प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. अखेर नारायण राणेंच्या जामीन अर्जावर अखेर निर्णय झाला असून महाड कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे नारायण राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

Leaf water for constipation: पोट साफ होत नाहीये, आतड्यांमध्ये घाण साचलीये? सकाळी उठल्यावर फक्त या 1 पानाचं पाणी प्या!

Maharashtra News Live Update: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

Diamond Mangalsutra Designs: नववधूसाठी खास डायमंड मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT