Manasvi Choudhary
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र काही फारसा फरक दिसत नाही. अनेकजण जिम, डाएट देखील फॉलो करतात.
मात्र यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे. घरीच तुम्ही हा उपाय करू शकता.
आयुर्वेदात, तुळशीला विशेष स्थान आहे. सर्दी, खोकला, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अनेकदा तुळशीच्या चहाचा किंवा काढ्याचा वापर करतो.
पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीची पाने ही वाढलेली पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.
१) अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्याच्या समस्या दूर होते.
२) पचनक्रिया सुधारण्यास मदत
३) शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
४) मेटाबॉलिझम सुधारतो.
गॅसवर एका भांड्यात गरम पाणी उकळवत ठेवा.
त्यात १० ते १२ ताजी तुळशीची पाने, आले आणि अर्धा चमचा जिरे टाका.
हे पाणी चांगले उकळून घ्या.
त्यानंतर ते गाळून नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.