theaf 
महाराष्ट्र

एकाच रात्री सात गावात चोरी; मंदिरातील दानपेटी चोरीचाही प्रयत्‍न

एकाच रात्री सात गावात चोरी; मंदिरातील दानपेटी चोरीचाही प्रयत्‍न

दिनू गावित

नंदुरबार : शहादा तालुक्यात एकाच रात्री सात गावात चोरी झाल्‍याचे समोर आले आहे. या गावातील ९ घरांसह ३ दुकाने चोरट्यांनी फोडली असून यात ७० हजार पेक्षा अधिक रक्कम व मालाची चोरी झाली आहे. तर मंदिरातील दान पेटीचाही चोरीचा प्रयत्न झाला आहे.

अवकाळी पाऊस व थंडीचा फायदा घेत चोरट्यांनी शहादा (Shahada) तालुक्यातील कहाटूळ, जयनगर, बोराळे, टेंभा तसा, कलंबू, फेस, वडाळी या गावात एकाच रात्री धाडशी चोरी केल्याची घटना घडली आहे. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दानपेटी सोडून चोरट्यांचा पोबारा

कहाटूळ येथे एका घरात तर तीन दुकानात चोरी, फेस येथे 2 घरात चोरी, वडाळी येथे एक घरात चोरी, बोराळे येथे एक घरात चोरी, टेंभा तसा येथे एक घरात चोरी, कलंबू येथे 3 घरात चोरी तर जयनगर येथील हेरंब गणेश मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तसेच गाभाऱ्यातील प्रवेशद्वार तोडून दानपेटी उचलण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दानपेटी हलकी लागल्याने ती सोडून चोरट्यांनी पोबारा केला.

मुद्देमालाचा अंदाज अद्याप नाही

चोरीच्‍या या घटनांमध्ये चोरट्यांनी वेगवेगळ्या दुकानातून सुमारे ७० हजार रुपये रोख व मालाची चोरी केली. चोरी झाल्याची घटना कळताच सारंगखेडा व शहादा पोलिसांनी धाव घेत श्वान पथकासह तपास सुरू केला आहे. चोरी झालेल्या घरांपैकी काही नागरिक बाहेरगावी असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला आहे समजू शकले नाही. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार रात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान अवकाळी पाऊस व थंडीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सदर चोरटे मध्य प्रदेश राज्यातून आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल मंदिर जतन संवर्धन कामाचे ऑडिट होणार

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह झाला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT