Mahavikas aaghadi 
महाराष्ट्र

महाआघाडीचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यातच; राष्‍ट्रवादी आजमावतेय नशीब

महाआघाडीचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यातच; राष्‍ट्रवादी आजमावतेय नशीब

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आता अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्‍ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाआघाडी करून निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार आहेत. हे सध्या झालेल्या या पक्षाचा बैठकीतील सकारात्मक चर्चेतून निश्‍चित झाले आहे. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरतच नसल्याने महाआघाडीचा फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच आहे. (nandurbar-zilha-parishad-election-ncp-no-seat-and-mahavikas-aaghadi-no-final-farmula)

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुकीचा रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यात कोणी पूर्ण ११ जागांवर, तर कोणी काही ठरविक जागांवरच उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. मात्र निवडणुकीतील चुरस पाहता भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा नेत्यांमध्ये बैठक होऊन महाआघाडी करून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला आहे. मात्र तीन बैठका सकारात्मक झाल्या असल्या तरी महाआघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.

राष्‍ट्रवादी आजमावते नशीब

सदस्यत्व रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या ११ जागांपैकी सर्वधिक सात जागा भाजपच्या आहेत, तर शिवसेना व काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकही जागा गेलेली नाही. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीचा रिंगणात उतरून आपल्या पदरी जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या पाडून घेण्यासाठी तयारी केली आहे. त्यात त्यांनी नंदुरबार तालुक्यात तीन, शहादा तीन व अक्कलकुवा एक, असे सात गटांत उमेदवार दिले आहेत. तर पंचायत समतीसाठी त्यांना शहाद्यात पोषक वातावरण असल्याने त्यांनी नंदुरबार व शहाद्यात आठ गणांमध्ये उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने व काँग्रेसनेही सर्वच जागांवर उमेदवार दिले आहे.

फॉर्म्युला ठरत नसल्याने चित्र अस्पष्ट

आदिवासी मंत्री ॲड. के. सी. पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, दिलीप नाईक व शिवसेना नेते माजी आमदर चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, आमशा पाडवी, ॲड. राम रघुवंशी तर राषट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांची तीन वेळेस बैठक होऊनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यात विशेषतः खरी बोलणी शिवसेना व काँग्रेसमध्येच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाआघाडी तर करायची मात्र जागा वाटपाचा प्रश्‍न दूर होत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने सर्वच पक्षांनी आपआपले उमेदवार सज्ज ठेवले होते. त्यांचे अर्ज दाखल करून सावधगिरी बाळगली आहे. जर महाआघाडी नाही झाली तरी ते स्वबळावर लढू शकतील याच तयारीने तिन्ही पक्ष सज्ज झाले आहेत. त्या पद्धतीने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी व नेत्यांनी प्रचार सुरू केला आहे. १२ जुलैपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत जागा वाटप निशचित झाले तर ज्या पक्षाला ज्या गटात व गणात जागा दिली जाईल, त्या गट व गणातून महाआघाडीचे इतर पक्षांचे उमेदवार माघार घेऊन ती जागा संबंधित मित्र पक्षाला सोडली जाईल. असे असले तरी महाआघाडीतील तिन्हीही पक्ष अत्यंत सावध भूमिका घेत आहेत. त्यामुळेच जाग वाटपाचा फॉर्म्युला बाबत गूढ कायम ठेवत आता पुढे काय निर्णय होतो, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT