Sakshi Sunil Jadhav
चरतत्वाची असणारी आपली रास. आज विशेषत्वाने देवी उपासना सुद्धा फलदायी होईल. काही भाग्यकारक घटना आज घडतील असा विश्वास ठेवा.
कामांमध्ये उगाचच अडचणी उद्भवण्याचा संभव आहे. विनाकारण मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधून पुढे जाल. कामाच्या बाबतीत भागीदारी व्यवसायामध्ये सुद्धा सुयश लाभणार आहे.
आज शत्रूंचा त्रास संभवत आहे. कदाचित वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी यामध्ये पाण्यापासून होणारे रोग, मानसिक आजार यापासून काळजी घ्या.
आर्थिक क्षेत्रात नव्याने धाडस करायला हरकत नाही. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. आपल्या मधील नवनवीन गोष्टी कार्यान्वित होतील.
प्रॉपर्टी चे सौख्य आज लाभणार आहे. मनात आलेल्या इच्छा परिपूर्णतेकडे जाण्याचा आजचा दिवस आहे.
"ठरवाल ते करूच" अशी जिद्द आणि चिकाटी घेऊन आज वावराल. नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आज प्रयत्न कराल. काही वेळेला मौन धारण करते जास्त बरे राहील.
आपले मनोबल वाढवणारी एखादी घटना आज घडणार आहे. दिवस चांगला आहे .
आपले रास कितीही हिशोबी असेल, कंजूस असेल तरीसुद्धा आज काही बाबतीत दक्षता घ्यावी लागेल.
आपल्या प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. दिवसाची सुरुवात चांगल्या घटनांनी आणि शेवटही चांगल्या घटनांनी होईल.
तुमचे असणारे कार्यक्षेत्रामध्ये आज मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. प्रगतीकडे वाटचाल होईल.