Nandurbar : नागरिकांना चावा घेणारी पिसाळलेली घोडी अखेर जेरबंद! File Photo
महाराष्ट्र

Nandurbar : नागरिकांना चावा घेणारी पिसाळलेली घोडी अखेर जेरबंद!

नवापूर शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका पिसाळलेल्या घोडीचा थैमान सुरू होता.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नवापूर शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका पिसाळलेल्या घोडीचा थैमान सुरू होता. नागरिकांना त्या घोडीने चावा घेतल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर केला होता. नगरपालिकेने यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली होती.

हे देखील पहा :

नवापूर शहरातील जनता पार्क, मंगलदास पार्क,शांती नगर, आदर्श नगर, लाखानी पार्क, रंगेश्वर पार्क, प्रभाकर कॉलनी नवापूर शहरातील विविध भागांतील चार ते पाच नागरिकांना चावा घेतला आहे. त्याची दखल घेत नगराध्यक्ष हेमलता पाटील यांच्या सूचनेनुसार माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, यांनी तात्काळ त्या घोडीला पकडण्यासाठी टिम तयार करून दोरीच्या सहाय्याने शोएब काकर,आसीफ कलीम शहा, नसरुद्दीन बाबू शहा, या युवकांनी रंगेश्वर पार्क जवळ या घोडीला पकडले.

घोडीला जेरबंद केल्यानंतर पाय बांधून पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे नवापूर शहरात पुन्हा मोकाट गुरांचा व कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर पालिकेने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT