Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : देवासमोर दिवा लावून बाहेर जाताच झाला घात; आग लागल्याने दोन घरे जळून खाक

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील तुळाजा येथे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी देवाला दिवा लावून घर मालक घराच्या बाहेर गेले असतांना झोपडीला अचानक आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : सकाळी नेहमीप्रमाणे देवपूजा करून देवघरात दिवा लावला. यानंतर बाहेर जाताच देवासमोर (Nandurbar) लावलेल्या दिव्यामुळे घराला आग (Fire) लागल्याची घटना घडली. यात दोन घर जळून खाक झाली असून यात घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जाळले आहे. (Live Marathi News)

तळोदा (Taloda) तालुक्यातील तुळाजा येथे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी देवाला दिवा लावून घर मालक घराच्या बाहेर गेले असतांना झोपडीला अचानक आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे. घराला आग इतकी प्रचंड होती की, काही सुचण्या आधीच आगीने रौद्ररूप धारण केले व घरातील संसारोपयोगी सर्व समान जळून खाक झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसार उघड्यावर 

आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आगीचे स्वरूप इतके प्रचंड होते की होत्याचे नव्हते झाले. यात खुशाल तानाजी नरवत व आण्णा तानाजी नरवत ह्या दोघा भावंडांचे घर जळून खाक होऊन संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामा करुन शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT