Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : शेतात कापूस वेचणी करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला; अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याकडून हल्ला केला जात असल्याचे घटना एकामागून एक सुरूच आहेत. यामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच पाहण्यास मिळतो. दरम्यान तळोदा तालुक्यातील मागील काही दिवसांपासून बिबट्या निदर्शनास येत होता. यातच तालुक्यातील दलेरपूर येथे शेतात कापूस वेचणीचे काम करत असलेल्या कुटुंबावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात बिबट्याकडून हल्ला केला जात असल्याचे घटना एकामागून एक सुरूच आहेत. यामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे. तर काही जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच तळोदा तालुक्यातील दलेरपुर शिवारात शेतामध्ये कापसाची वेचणी करत असलेल्या मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला (Leopard Attack) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.  

डोक्याला गंभीर दुखापत 

शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. यात अकरा वर्षीय अनिल करणसिंग तडवी हा गंभीर जखमी झाला होता. यानंतर अनिल तडवी यास तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे.  

बंदोबस्त करण्याची मागणी 

तळोदा तालुक्यात बिबट्यांचा वावर आणि हल्ले लक्षात घेत शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील वाढत्या बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी वनविभागाच्यावतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतात कामासाठी मजूर जाण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने या भागातील हिंसक बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

SCROLL FOR NEXT