Badlapur News : बदलापुरातील रेल्वे उड्डाणपुलाला धोका?; व्हीजेटीआयचा धक्कादायक अहवाल

Badlapur News : बदलापूर पूर्व- पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल मागील वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे.
Badlapur News
Badlapur NewsSaam tv
Published On

बदलापूर : बदलापूर पूर्व- पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणापुलाला धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष व्हीजेटीआयच्या अहवालातून समोर आला आहे. यामुळे पुलावरील वाहतुकीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बदलापूर पूर्व- पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल मागील वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुलावर दरवर्षी वारंवार खड्डे पडतात आणि पालिकेकडून त्यावर पॅचवर्क केलं जातं. मात्र ही दुरूस्ती करताना पालिका प्रशासनाने पुलाच्या देखभाल दुरूस्तीचे नियम पायदळी तुडवले असल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला आहे.

Badlapur News
PM Jeevan Jyoti Policy Scam : नाशिकमध्ये राष्ट्रीयकृत बँकेत २ कोटी १२ लाखांचा अपहार; विमा धारकांचे दाखविले बोगस वारसदार

२०२२ मध्ये केले ऑडिट

दरम्यान व्हीजेटीआयच्या टीमने दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२२ मध्ये उड्डाणपुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यानंतर याबाबतचा अहवाल सादर केला. त्यानुसार हा रेल्वे उड्डाणपूल धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अहवालात

बदलापूरचा उड्डाणपूल काँक्रिट स्लॅबचा आहे. हे सर्व काँक्रिट स्लॅब एक्स्पंशन जॉइंटने जोडलेले आहेत. त्यामध्ये थर्मल स्टील प्रकारचं मटेरियल वापरलं जातं. तसेच हे जॉइंट्स मोकळे ठेवावे लागतात. त्यामुळे उड्डाणपुलावर एखादं अवजड वाहन गेल्यानंतर त्याचा भार उड्डाणपुलाच्या काँक्रिटवर कमी येऊन उड्डाणपुलाचं आयुष्य वाढण्यास मदत होत असते. मात्र बदलापुरात उड्डाणपुलावर खड्डे भरताना सातत्याने डांबराचे थर चढवले गेल्यानं हे एक्स्पंशन जॉइंट बुजले गेले आहेत.

Badlapur News
Markadwadi Voting: मारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान थांबवलं, उत्तम जानकरांचे प्रशासनावर आरोप

डांबरचा १० इंच थर

उड्डाणपुलावर जवळपास १० इंच डांबराचा थर तयार झाल्याने भार वाढत चालला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे आयुर्मान १० वर्षांनी कमी होऊ शकतं, असं व्हिजेटीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं असल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली.

मोठी दुर्घटना घडण्याची भीती

पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असून उड्डाणपुलावर जुन्याच पद्धतीने पॅचवर्क करून मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देत असल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा महासचिव संभाजी शिंदे यांनी केला आहे. दरम्यान पालिकेने अहवालातील बाबी गांभीर्यानं न घेतल्यास भविष्यात इथं एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही संभाजी शिंदे यांनी व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com