Tragedy in Nandurbar: Two sisters drown after falling into sand mafia pit in Taloda’s Rozva village saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक घटना ! दोन सख्ख्या बहि‍णींचा बुडून मृत्यू, जेवणापूर्वी हातपाय धुण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाहीत

Nandurbar sisters drown illegal sand pit Taloda : नंदूरबारमधील तळोदा तालुक्यात दोन सख्ख्या बहि‍णींचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. अवैध वाळू उत्खननासाठी खड्डा खोदला होता.

Nandkumar Joshi

  • दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू

  • नंदूरबारमधील तळोदा तालुक्यातील दुर्दैवी घटना

  • अवैध वाळू उत्खननामुळं खोल खड्डे तयार झाले होते

सागर निकवाडे, नंदूरबार | साम टीव्ही

नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रोझवा गावात हृदयद्रावक घटना घडली. वाळू उत्खननासाठी खोदलेल्या नाल्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. त्या दोघीही शेताजवळील नाल्यात हातपाय धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी या नाल्यात बुडून दोघींचाही मृत्यू झाला.

तळोदा तालुक्यातील रोझवा गावात ही दुर्दैवी घटना घडली. नाल्यात बुडून दोन्ही सख्ख्या बहिणींनी जीव गमावला. ललिता आणि कोबी अशी मृतांची नावे आहेत. या दोघीही शेतात उडीद काढण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी जेवणाच्या आधी दोघीही शेताजवळच्या नाल्यात हातपाय धुण्यासाठी गेल्या होत्या. पण त्या परतल्याच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे वाळूमाफियांनी अवैध रेती उत्खननासाठी हा नाला खोदला होता. या नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून या दोघींचा मृत्यू झाला.

खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं अनर्थ

तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे नाल्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ललिता रूपसिंग पावरा (वय 35), कोबी रूपसिंग पावरा (32) या दोन्ही बहिणी आपल्या आई तारकीबाई यांच्यासह सकाळी शेतात उडीद काढण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी जेवणापूर्वी त्या शेताजवळील स्मशानभूमी परिसरातील नाल्यात हातपाय धुण्यासाठी गेल्या. बराच वेळ झाल्यानंतर त्या परतल्या नाहीत, म्हणून आई तारकीबाई शोध घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांना नाल्याजवळ कपडे व ओढणी दिसली. संशय आल्याने गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.

भाईदास पावरा, खेमजी वसावे, मोगा पावरा यांसह गावकऱ्यांनी पाण्यात शोध घेतला असता दोन्ही बहिणी मृतावस्थेत आढळल्या. त्वरित तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अकिल पठाण यांनी पंचनामा केला. मृत तरुणींचे भाऊ सुरेश रूपसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोझवा लघु सिंचन प्रकल्पाच्या नाल्यात जेसीबीद्वारे वाळू काढल्याने खोल खड्डे निर्माण झाले होते. त्याच ठिकाणी साचलेल्या पाण्यात बुडून दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT