Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या चॉकलेट फेकल्या उघड्यावर; नंदुरबार शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

Nandurbar News : शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स परिसरातीलच कुठल्यातरी शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शालेय मुलांना पोषण आहारात आता मिलेटबार चॉकलेट देखील खाऊच्या स्वरूपात दिल्या जातात. मात्र या चॉकलेट उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद ते पाडळदा गावाच्या रस्त्यावर आढळून आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 

शहादा (Shahada) तालुक्यातील म्हसावद ते पाडळदा गावाच्या रस्त्यावर एका घराशेजारी शिक्षण विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट बार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. या शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स परिसरातीलच कुठल्यातरी शाळेतील विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात आला होता. परंतु सदर चॉकलेट्स रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळल्याने (Education Department) शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  

एकीकडे नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. हे कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. याच अनुषंगाने पोषण आहारात मिलेट बार चॉकलेट देण्यात आल्या आहेत. मात्र शालेय (Poshan Aahar) पोषण आहारात देण्यात येणारे मिलेट्स बार चॉकलेट्स रस्त्यावर फेकले जात असल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद पाडळदा रस्त्यावर समोर आले आहे. या प्रकरणाचा चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख, यंदाच्या खरिपात कर्जमाफीचा लाभ नाहीच?

नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, पिंजऱ्यातूनच महिला डॉक्टरचा वाघिणीवर नेम

पालखीत वारक-यांना लुटणारे चोरकरी, पुण्यात वारीत चोरी, धास्तावले वारकरी, खाज-खुजली टाकून लुटणारी टोळी

एकापेक्षा अधिक लग्न केल्यास सरकारी नोकरी जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ऑपरेशन टायगर 4.0 लवकर होणार? नाशिकमध्ये ठाकरेंचे 12 नगरसेवक फुटणार?

SCROLL FOR NEXT