Nandurbar Crime Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Crime : नंदुरबार हादरले; कौटुंबिक वादातून नातवाने आजोबाला संपविले, शहादा शहरातील रात्रीची घटना

Nandurbar News : दशरथ राजे हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी शिरूड रस्त्यावर गेले होते. याच वेळी नातवाने आजोबांच्या मानेवर चाकूने वार केले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  

नंदुरबार : घरात वारंवार वाद होत असताना अल्पवयीन असलेल्या सख्ख्या नातवाने आपल्या मित्रांच्या मदतीने आजोबाचा खून केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहादा शहरात खळबळ उडाली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील शिरुड रस्त्यानजीक या वयोवृद्ध इसमाची हत्येचा प्रकार घडला असून कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. दशरथ राजे (वय ६०) असे घटनेत मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दरम्यान दशरथ राजे हे रात्री नऊ वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी शिरूड रस्त्यावर गेले होते. याच वेळी नातवाने आजोबांच्या मानेवर चाकूने वार केले. 

यात दशरथ राजे हे जमिनीवर कोसळले. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत दशरथ याना रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण शहादा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोघेजण ताब्यात 

या हत्या करण्यामागे नातवाचा आणि त्याच्या मित्राचा समावेश असून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांचा जवळून एक दुचाकी आणि एक धारदार शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. या दोघा मित्रांना विरोधात आता शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT