Nandurbar student video Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Shocking : बापरे! विद्यार्थ्यांची जीवघेणी धडपड; बसमध्ये चढताना मुलगा चाकाखालीच गेला, सुदैवाने जीव वाचला, VIDEO

Nandurbar student video : नंदूरबारमध्ये बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी धडपड पाहायला मिळत आहे. बसमध्ये चढताना मुलगा चाकाखालीच गेल्याचं आढळलं. या घटनेत सुदैवाने वाचला.

Vishal Gangurde

सागर निकवाडे, साम टीव्ही प्रतिनिधी

नंदूरबार : नंदुरबार शहरात अनेक शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नंदुरबारमध्ये येत असतात. या विद्यार्थ्यांना परत गावाकडे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा मोठा गोंधळ उडत असतो. त्यातच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी विद्यार्थी जीव धोक्यात घालून बसमध्ये जागा मिळवतात. या विद्यार्थ्यांचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

बसमध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतात. या विद्यार्थ्यांमधील एक विद्यार्थी बसखाली खाली गेला. त्यानंतर हा विद्यार्थी थेट एसटीच्या मागील चाकात अडकला. या विद्यार्थ्याचा पाय हा बसच्या मागच्या चाकात अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलं. यामुळे थोडक्यात या विद्यार्थ्यांचा जीव वाचला. या विद्यार्थ्याच्या पायाला किरकोळ जखम झाली. घटनास्थळावरील उपस्थितांना वेळीच ही गोष्ट लक्षात आली नसती, तर त्या शालेय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला असता.

नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालयात जिल्हाभरातून विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी नंदुरबारला येत असतात. या विद्यार्थ्यांची बस स्थानकावर मोठी गर्दी होते. विद्यार्थी बसमध्ये चढण्यासाठी एकच गोंधळ करत असतात. बस स्थानकावर गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. यासोबतच गावाकडे जाण्यासाठी कमी बस असल्यामुळे या बस प्रवाशांनी भरलेल्या असतात. त्यातच विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे नंदुरबार बस स्थानकावर नेहमीच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे चित्र नंदुरबार बस स्थानकावर पाहायला मिळते.

दरम्यान, नंदूरबारमधील घटनेनंतर विद्यार्थ्यांचा बस प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळ विशेष बस का सोडली जात नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. एसटी महामंडळाने विशेष बस सोडल्यास विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत कमी होण्यास मदत होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT