Nandurbar Sarangkheda Horse Festival Saam Tv1
महाराष्ट्र

Dancing Horse: या घोड्यासमोर मोठमोठे डान्सरही होतील फेल, तब्बल 18 प्रकारचे नृत्य प्रकार आहेत अवगत

साम टिव्ही ब्युरो

>> सागर निकवाडे, नंदुरबार

Viral News of Dancing Horse:

सारंगखेडा घोडे बाजारात विविध कर्तब दाखवणारे घोडे नेहमीच अश्व शौकीनांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतात. यातलाच एक म्हणजे डान्सर सुर्या घोडा. एक दोन नव्हे तर तब्बल 18 प्रकारचे नृत्य प्रकार अवगत असलेला सुर्या आपल्या लिलया नृत्याने सगळ्यांनाच आकर्षीत करत आहे. त्याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

पंजाबी जातीचा पंधरा वर्षीय पांढरा शुभ्र आणि रुबाबदार दिसणारा हा सुर्या आपल्या नृत्याविष्काराने सर्वांनाच अचंभित करत आहे. मध्य प्रदेशच्या बडवाणीच्या सुर्यास्टड फार्मच्या बंटीभाईचा हा घोडा सारंगखेडा घोडे बाजारात सध्या लहान मोठ्या सर्वच अश्वशौकींनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. एखाद्या पांरगत नृत्याकाराला लाजवल असा नृत्य करणारा सुर्या एक दोन नव्हे तर तब्बल अठरा प्रकारची नृत्य करत असल्याचे त्याच्या मालकाचा दावा आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खाटेवर नाचणाऱ्या या सुर्या घोड्याने नृत्यात अनेकांची खाट पाडत 2019 चेतक फेस्टीवलच पहिले पारितोषिकही पटकावले आहे. पंजाबहून घेतलेल्या या सुर्या पंजाबी नुकरा जातीचा असून त्याला देशपातळीवरील घोड्यांच्या नृत्य स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी तब्बल तीन वर्षांहून अधिकचा कालावधी लागला आहे. (Latest Marathi News)

सोबतच त्याचे मालक त्याची रखरखाव अतिशय उत्तम प्रकारे करत असून त्याला संतुलित दिला जातो. सध्या हिवाळा असल्याने त्याच्या रोजच्या आहारात मध, सरसोचे तेल, गुळ, बाजरी आणि रोज दहा बदामाचा खुराक दिला जातो. महिन्याला वीस हजार रुपये या सुर्यावर खर्च करुन त्याच्या देखरेखीसाठी खास दोन मानसे त्याच्या दिमतीला देखील असतात.

जवळपास 59 इंचाची उंच असलेला हा सुर्या विना लगामही उत्कृष्ठ आणि मोहक नृत्याविष्कार सादर करतो. त्यामुळे कमाईसाठी नव्हे तर फक्त मोठ्या कार्यक्रमांमध्येच नाचवण्यासाठी सुर्याला मालक बाहेर सादर करत असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT