Nandurbar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Accident: दोन भरधाव दुचाकी एकमेकांना धडकल्या, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Nandurbar Accident latest news in Marathi: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात दोन दुचाकीच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. २ दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे.

Vishal Gangurde

सागर निकवाडे,नंदुरबार

Nandurbar Accident News:

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. २ दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मुंगबारी फाट्यावर दुचाकीचा अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंगबारी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातात एका महिलेचा हात तुटला आहे. त्यासोबत इतर लोक गंभीर जखमी आहेत. या जखमींमध्ये एका बालकाचाही सामावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंगबारी फाट्यावर भीषण अपघात झाल्यानंतर काही लोकांनी तातडीने अपघातग्रस्तांच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. या लोकांनी जखमींना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या अपघातामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची घटना कोल्हापुरात घडली. दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूरहून ज्योतिबाला जाताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला. अपघातग्रस्त कारमधील एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

कार अपघातावर तानाजी सावंत काय म्हणाले?

कोल्हापुरात अपघात झाल्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी 'एक्स'वर पोस्ट करत माहिती दिली. ' कोल्हापूर नियोजित दौऱ्यावर असताना माझ्या गाडीला छोटासा अपघात झाला. आई महालक्ष्मी व जोतिबाच्या तसेच राज्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी व माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत', अशी पोस्ट तानाजी सावंत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast : 'दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच'; केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

लग्नमंडपात नवरदेवाला भोसकलं; ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला थरार

Sangli Tourism: सांगलीमध्ये लपलाय 'हा' भव्य किल्ला; जाणून घ्या ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्यं

Maharashtra Live News Update: सीएसएमटी ते खोपोली जाणाऱ्या लोकलच्या पंख्यामधून अचानक निघू लागला धूर

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT