Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकीय वाद पेटला! शिंदेंच्या नेत्याच्या घरावर हल्ला, दगडफेक करत कार जाळण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

Nandurbar Political News: नंदुरबारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. शिंदेंच्या नेत्याच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. या दगडफेकीमध्ये घराचे मोठे नुकसान झाले. हल्लेखोरांनी कार देखील जाळण्याचा प्रयत्न केला.

Priya More

Summary -

  • नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापले

  • माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक

  • कार जाळण्याचा प्रयत्न आणि घराच्या काचा फोडल्या

  • ३० हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. घरावर झालेल्या दगडफेकीत खिडक्यांचे काचा फुटल्या. तसंच माजी आमदाराची कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ३० पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबार नगर परिषदेवर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. नगर परिषदेमध्ये शनिवारी उपनगराध्यक्ष पदासाठी विशेष सभा घेण्यात आली होती. या मतदान प्रक्रियेत प्रथमेश चौधरी यांनी ३० मतांनी विजय मिळवला. प्रथमेश चौधरी यांच्या निवडीनंतर दुपारच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादानंतर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक केली.

नंदुरबार नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या ५ पैकी ४ मुस्लिम उमेदवारांचा पराभव झाला होता. या चारही जागांवर एमआयएम पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला होता. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून ३ स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळाली. यांच्यात मुस्लिम चेहरा म्हणून माजी उपनगराध्यक्ष हाजी परवेज खान यांना संधी देण्यात आली. हाजी परवेज खान हे शिंदेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम समाजातील प्रमुख चेहरा आहेत. मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी परवेज खान यांना संधी देण्यात आल्याची चर्चा नंदुरबारमध्ये सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाहन चालवताना सावध राहा, 5 राशींचा वाढेल खर्च; वाचा बुधवारचे राशीभविष्य

धक्कादायक ! १४ वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता समीकरण बदललं; ब्राह्मण समाजाच्या आमदारांच्या नाराजीनंतर भाजप करणार मोठे बदल

Maharashtra Live News Update : भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

Mi Savitribai Jyotirao Phule: इतिहास, परंपरा आणि भावना; सावित्री-जोतीरावांच्या विवाहातून उलगडणार ऐतिहासिक पर्व

SCROLL FOR NEXT