महाराष्ट्र

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी ॲड. राम रघुवंशी

दिनू गावित

नंदुरबार : नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल होता. यामुळे रघुवंशी यांची बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची वर्णी लागली आहे. (nandurbar-news-zilha-parishad-ram-raghuvanshi-vice-president-selection)

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवड़णुक झाली. उपाध्यक्ष पद रिक्त असल्याने त्याची निवड प्रक्रिया आज पार पडली. यात उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल होता. तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी ॲड. राम रघुवंशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर विषय समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची वर्णी लागली आहे. याबाबतचे अधिकृत घोषणा पिठासिन अधिकारी  चेतनसिंग गिरासे यांनी केली.

यापुढेही महाविकास आघाडी : रघुवंशी

नंदुरबार जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता असून गेल्या पोट निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. शहादा आणि नंदुरबार पंचायत समिती देखील महा विकास आघाडीने सत्ता पालट करून काबीज केल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतदारांनी नाकारले. यापुढेही महाविकास आघाडी निवडणूक लढवून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. तर नवनियुक्त उपाध्यक्ष व विषय समिती सभापती यांनी जिल्ह्याचा विकासासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षीय बलाबल

नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये सद्यस्थितीत कॉँग्रेस सर्वाधिक २४, भाजपा २०, शिवसेना ८ तर राष्ट्रवादी ३ असे पक्षीय बलाबल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT